माती परीक्षण का करावे ?

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

आपल्या जमीनीत कोणती अन्नद्रव्य व सुक्ष्म अन्नद्रव्य कमी जास्त आहे याची माहीती होते. अतिरीक्त खतांचा वापर कमी होतो व कोणते खत कोणत्या पिकाला किती टाकावे याची माहीती होते.


शेतीवर होणारा अतिरीक्त खर्च कमी होतो. व अती खते वापरामुळे जमीनीचा पोत जो खराब झाले आहेत मार्गदर्शन मिळते. तसेच जमीनीच्या पोतानुसार कोणती पिके घ्यावी याचे मार्गदर्शन मिळते. असमतोल खतांच्या वापरामुळे उत्पादनात घट होते व जमीनीची उत्पादक क्षमता कमी होते. त्यावर उपाय समजतो.

शेतकऱ्यांना मातीपरिक्षणाबाबतीत समस्या:

१. मातीचे नमुने शास्त्रीय पादीतीने कसे घ्यावे या बाबतीत माहीती नाही. 
२. मातीचे नमुने एखादया प्रयोगशाळेत दिले तर त्याचे रिपोर्ट मिळत नाही,
३. मिळालेले रिपोर्ट बरोबर आहे की नाही याची शाश्वती मिळत नाही.
४.रिपोर्ट जरी मिळाले तरी त्या नुसार योग्य मार्गदर्शन मिळत नाही. वरील सर्व समस्या लक्षात घेता भारत सरकाच्या अधिनस्त असलेल्या सीएससी अर्थात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने एक महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ज्यातून आता वरील सर्व अडचणी शेतकन्यांना येणार नाहीत. शासनाने गावागावातील आपले सरकार केंद्र चालकांची जी जिल्हास्तरीय सहकारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमध्ये माती परिक्षण प्रयोगशाळा सुरु केली आहे. आपल्या गावातील केंद्र चालक आपल्याकडून मातीचे नमुने गोळा करून या प्रयोगशाळेला पाठवेल व आपल्याला घरपोच माती परिक्षणाचा रिपोर्ट मिळेल. हा एक पुर्णत व्यवसायीक उपक्रम असल्या कारणाने या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शुल्क दयावे लागेल. परंतु आपण दिलेल्या शुल्काच्या बदल्यात आपणांस योग्य सेवा मिळाली की नाही यावर शासनाचे पुर्णत नियंत्रण राहील,

उद्देश

आपल्या जमीनीतील माती दरवर्षी तपासून आपल्या जमीनीत पोषकतत्वे जैवीक पध्दतीने वाढावे यासाठी मार्गदर्शन करून आपली जमीन विषमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेनेकरून आपल्या जमीनीत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपला शेतमाल परदेशात निर्यात करणे शक्त नाही. म्हणून सतत मातीपरिक्षण करून आपल्या जमीनीतील पोषक तत्वे जैवीक रित्या कसे वाढतील यासाठी आमचा प्रयत्न असेल. संपूर्णरित्या रासायनिक खतांचा वापर बंद करणे हे आजघडीला शक्य नाही. परंतु अतिरीक्त रासायनिक खतांचा वापर मात्र आपण नक्की थांबवू शकतो. आणी तो कळावा म्हणून माती परिक्षण आहे. आणी ते शास्त्रीय पध्दतीने करण्यासाठी मृदा संपदा माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा कार्यान्वीत आहे.

पाणी परिक्षण व देठ/ पान परिक्षण प्रयोगशाळा लवकरच सुरु होत असून याचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ यातून मिळणार आहे. 

आम्हाला शेतकऱ्यांना शेती आधारीत सर्व सेवा थेट बांदावर दयावयाचे असून त्यातुन शेतीचा खर्च कमी करणे व जास्तीचे उत्पन्न

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा उद्देश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable